नितेश राणेंची मागणी; कणकवलीत केले “फेस वायझर” मास्कचे वाटप….
कणकवली,ता.२७: कोरोनाच्या काळात पोलिसांसमवेत आरोग्य कर्मचारी,वकील आणि पत्रकार हे सामाजिक काम करत आहेत.त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडुन त्यांनी “रॅपिड टेस्ट” करण्यात यावी,अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आज येथे केली.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर श्री.राणे यांच्याकडुन आज नियमीत सेवा बजावणार्या पोलिस व वकीलांना “फेस वायझर” मास्कचे वाटप करण्यात आले,यावेळी श्री.राणे बोलत होते.
श्री.राणे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नियमित सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलीस व वकीलांना फेस वायझर मास्क वाटप करण्यात आले.यात कणकवली पटवर्धन चौकातील ट्राफिक पोलीसांकडे जिल्हाभरातील ट्राफिक पोलिसांसाठी ७२ तर तालुक्यातील वकीलांसाठी अॅड,राजेश परुळेकर यांच्याकडे १०० फेस वायझर मास्क सुपुर्द करण्यात आले.
यावेळी अॅड, उमेश सावंत, उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, विराज गोसावी, संजय कामतेकर ,पं. स. सदस्य मिलींद
मेस्त्री आदी उपस्थित होते.