सिंधुदुर्गनगरी ता.२७: जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपहार गृहामध्ये शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे.सुरभी सुशिक्षीत बेरोजगार विवध सेवा सहकारी संस्था यांच्याकडे हे केंद्र चालवण्यासाठी देण्यात आले आहे.
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी 150 थाळी मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषदेच्या 150 थाळींची सोय असणारी दोन शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातही शिवभोजन केंद्र सरु करण्याविषयी विचार झाला होता. तथापी तेथील उपहार गृहाची दुरुस्ती करणे गरजेचे होते. आता ही दुरुस्ती करण्यात आली असून त्याठिकाणी 50 थाळी पुरवठा करणारे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात ताळेबंदी आहे. आशावेळी स्थलांतरित, बेघर, मजूर यांच्यासाठी शिवभोजन केंद्र हे वरदान ठरत आहे. तसेच सर्व शिवभोजन केंद्रांच्या ठिकाणी दिनांक 29 मार्च 2020 रोजीपासून शिवभोजन थाळी ही 5 रुपये या नाममात्र दराने उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयात “शिवभोजन थाळी” सुरू…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES