अर्पणा कोठावळे; उंठावरुन शेळ्या हाकणार्यांना समाजकार्य कळणार नाही…
सावंतवाडी ता.२७: खासदार विनायक राउत यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रत्यक्ष फील्डवर उतरून लोकांसाठी कोरोनाच्या काळात काम करीत आहेत.त्यामुळे उंठावरुन शेळ्या हाकण्याचे काम करून अशा गोष्टीचे राजकारण करणार्या परशुराम उपरकर आणि प्रमोद जठार यांना ते कळणार नाही.असे प्रत्यूत्तर सावंतवाडी शिवसेनेच्या महीला तालुका प्रमुख सौ.अर्पणा कोठावळे यांनी आज येथे दिले.दरम्यान कोरोनाच्या काळात सदयस्थिती लक्षात घेता मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांना सल्ले देवून मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या बंधूत्वाचा धर्म पाळत आहे.त्यामुळे एकीकडे चांगले चाललेले असताना अशा प्रकारे जिल्ह्यात टिका करून उपरकर यांनी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करू नये,असेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.यात त्यांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर ही टिका केली आहे.डॉ गोळवणकर व डॉ हेगडेवार यांच्या मुशीत तयार झालेल्या श्री.जठार यांना अशा प्रकारे खालच्या थरावर जावून टिका करणे शोभत नाही,असे त्यांनी म्हटले आहे.