सावंतवाडी पोलिसांची कारवाई; बॅट-बाॅल टाकून केलेले पलायन…
सावंतवाडी/ शुभम धुरी,ता.२७: लाॅकडाऊनचे आदेश धाब्यावर बसवून येथील गरड भागात खेळणाऱ्या क्रिकेटवीरांना आज सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी दणका दिला. पकडण्यात आलेल्या त्या चौघांनाही पोलिस ठाण्यात नेत उठाबशांची शिक्षा सुनावण्यात आली.ही कारवाई आज रात्री उशिरा करण्यात आली. त्यांनतर त्यांना घरी सोडण्यात आले.
गरड परिसरात क्रिकेट खेळताना काही युवक आढळून आले होते, यातील काही जण गाडी तेथे टाकून पळून गेले होते. दरम्यान घटनास्थळी मिळालेली गाडी मोबाईल,बॅट-बॉल अन्य साहित्य जप्त करून पोलिसांनी त्या युवकांना ताब्यात घेतले, व पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याकडून उठाबशा काढून घेतले, ही कारवाई यादव यांच्यासमवेत त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.