Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानीती आयोगाने घेतली ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्याची दखल...

नीती आयोगाने घेतली ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्याची दखल…

वैभववाडी,ता.२७: कोरोना विषाणू विरूद्ध प्रशासनासोबत कार्यरत असलेल्या ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ संस्थेची दखल भारत सरकारच्या नीती आयोगाने काल झालेल्या लाईव्ह कॉन्फरन्सिंगमध्ये घेतली.
सतरा जिल्हे व तेवीस तालूक्यांमधून धान्य वितरण, पाच हजार मास्क वाटप, रेशनिंग व्यवस्थापन, कोविड विरुद्ध जनजागरण, विलगीकरण केलेल्या नागरीकांना जेवण, वैद्यकीय उपचार आणि संस्था तसेच वैयक्तिक कार्यकर्त्यांकडून जवळपास ६५ हजार रूपये पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीचे योगदान या कार्याची दखल भारत सरकारच्या नीती आयोगाने घेतली आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे असंख्य कार्यकर्ते राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या वैश्विक व अभूतपूर्व संकटात प्रशासनासोबत सहकार्याच्या भूमिकेत समाज शरण वृत्तीने कार्यरत असल्याची नोंद नीती आयोगाने घेतल्याबद्दल कार्यकर्त्यांना हूरूप आल्याची भावना संस्थेचे राज्य अध्यक्ष डाॅ. विजय लाड सचिव अरुण वाघमारे यांनी बोलून दाखवली अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments