सावंतवाडी ता. 28ः सर्पदंश झाल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या सोनुर्ली येथिल तरुणाचा गोवा बांबूळी येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
सुमन चद्रकांत हिराप रा. पाक्याचीवाडी वय 38 असे त्याचे नाव आहे. त्याला आठवड्यापुर्वी सर्पदंश झाला होता. शेतात काम करीत असताना घोणस जातीच्या सापाने त्याचा चावा घेतल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती.त्यामुळे त्याला येथिल कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले होते.मात्र त्या ठीकाणी निदान न झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले होते ,मात्र त्या ठीकाणी त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती दरम्यान आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई वडील भाउ भावजय पत्नी मुलगा असा परिवार आहे.
सुमन हा सोनुर्ली गावात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित होता तसेच अनेकांच्या वेळाप्रसंगाला तो धावून जात असे त्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.