सिंधुदुर्गनगरी,ता.२८ : राज्यात होणारे रोजगार मेळावे, त्यांसाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेंत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे यासाठी जिल्ह्यातील बेरोजगारांनी आपली माहिती ऑनलाईन पद्धतीने अद्ययावत करावी. त्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग सु.श.पवार यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढविणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरूस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी अधिसूचित केलेल्या रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारांचा अर्ज सादर करणे, या बाबींचा समावेश या संकेतस्थळावर करण्यात आला आहे.
उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांचा याद्यामध्ये समावेश होण्यासाठी व विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी उमेदवाराने आपले आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. तरी ज्या उमेदवारांनी आधार कार्ड लिंक केलेले नाही त्यांनी तातडीने आधार जोडणी करावी. याबाबत काही अडचणी असल्यास 02362-228835 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सु.श.पवार सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
ऑनलाईन माहिती अद्ययावत करण्याचे बेरोजगारांना आवाहन….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES