सिंधुदुर्गनगरी ता.२८: जिल्ह्यात आजमितीस ३०२ जण अलगीकरणात आहेत. त्यापैकी २०० जणांना घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले असून १०२ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत एकूण 316 नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्यातील 287 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 29 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 71 रुग्ण दाखल आहेत. तर आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 2625 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
विलगीकरण व अलगीकरणात असलेल्या व्यक्ती आणि जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे तसेच esanjeevaniopd.in या वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचारविषयक मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अ.क्र विषय संख्या
1 घरीच अलगीकरण करण्यात आलेले 200
2 संस्थात्मक अलगीकरणात असलेले 102
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 316
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 287
5 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 1
6 निगेटीव्ह आलेले नमुने 286
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 29
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 71
9 सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 00
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2625
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३०२ व्यक्ती अलगीकरणात….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES