कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना “डिजिटल थर्मामीटर” चे वाटप…
वेंगुर्ले,ता.२८: वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायततीने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डिजिटल थर्मामीटर मशीन पुरविल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर परुळेबाजार ग्रामपंचायत प्रभावी उपाययोजना राबवित आहे. शासन नियमांचे काटेकोर पालन केले जातं आहे. याचाच एक भाग म्हणून उपकेंद्र परुळेबाजार व कर्ली यांना डिजिटल थर्मामीटर मशीन उपलबद्ध केले आहेत. सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच विजय घोलेकर यांच्या हस्ते हे उपकरण आरोग्य विभागाला देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शरद शिंदे उपस्थित होते. या मशीन मुळे आरोग्य कर्मचारी यांना गावांत आरोग्य तपासणी करणे सुलभ होणार आहे. कोरोना संक्रमण च्या खबरदारी म्हणून ग्रामपंचायत सर्वांच्या सहकार्याने विविध उपाययोजना करत आहे.