गजानन पालेकर; लॉकडाउन वाढणार असल्याने जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा….
आंबोली,ता.२८: मुंबई-पुणे येथे अडकलेल्या चाकरमान्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनीधीनी प्रयत्न करावेत, अशी मागणी आंबोलीचे माजी सरपंच आणि भाजपाचे पदाधिकारी गजानन पालेकर यांनी केले आहे.लॉकडाउनचा कालावधी तीन मे ला संपण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे त्यांना या ठीकाणी आणून क्वारंनटाईन करा. परंतू सकारात्मक निर्णय घ्या, असे ही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दी पत्रक दिले आहे. यात असे नमुद करण्यात आले आहे की, लॉकडाउन मुळे मुंबई, पुण्यात अडकलेल्या अनेक चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. अनेकांकडे असलेले पैसे संपले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक यातना भोगाव्या लागत आहेत. अशाबाबतची माहीती चाकरमान्यांकडुन तसेच त्यांच्या नातेवाईकांकडुन मिळत आहे. त्यामुळे त्यांचा सहानभूतीपुर्वक विचार करुन जिल्हा प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी पालेकर यांनी केली आहे.