मालवण, ता. २८ : १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना असतानाही बाहेर फिरणाऱ्या शहरातील धुरीवाडा येथील एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित व्यक्ती ही २४ एप्रिल रोजी विजयदुर्ग येथून मालवण धुरीवाडा येथे आली होती. त्याची आरोग्य तपासणी करून त्याला १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र हा व्यक्ती बाहेर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच काल तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केलेल्या पाहणीत बोर्डिंग मैदान नजिक एका स्टॉल वरून खरेदी करताना तो सापडला. त्यामुळे होम क्वारंटाईनचा भंग केल्याप्रकरणी आरोग्य सेवक चांदोसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर भादवि कलम २६९, २७०, २९०, २९१, १८८, साथीचे रोग ३,४, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत फार्णे करत आहेत.
क्वारंटाइनचा भंग केल्याप्रकरणी मालवणात एकावर गुन्हा दाखल…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES