वैभववाडी,ता.२९: लोरे नं. २ येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक धोंडू विठोजी रावराणे वय ८४ यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
मध्यामिक विद्यालय लोरे या प्रशालेच्या स्थापनेत श्री धोंडू रावराणे यांचे मोठे योगदान होते. त्यांनी स्वतःची जमीन विनामूल्य या शाळेसाठी दिली.
लोरेकर एक्यावर्धक मंडळ मुंबई या मंडळाचे ते गेली २० वर्षे स्थानिक अध्यक्ष होते.
मनमिळावू स्वभावामुळे ते पंचक्रोशीत लोकप्रिय होते.
झाडे लावा झाडे जगवा निसर्गावर प्रेम करा हा त्यांचं छंद होता.
गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो – धोंडू रावराणे.