के.मंजूलक्ष्मी; दोन्ही घटनाच्या पार्श्वभूमिवर घेतलीय आवश्यक ती खबरदारी…
सिंधुदूर्गनगरी ता.२९: जिल्ह्यात कोरोना पॉझीटिव्ह म्हणून आढळून आलेल्या त्या युवतीला वेळीच कॉरन्टाईन करण्यात आल्याने तुर्तास तरी तिच्या संपर्कात आलेल्या वक्तींची संख्या कमी आहे.तसेच सावंतवाडी एका गरोदर महीलेला सोडण्यासाठी आलेल्या कोल्हापूर येथिल एक व्यक्ती पॉझीटिव्ह आढळली आहे.मात्र दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमिवर आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे,अशी माहीती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी रुग्ण आढळून आली आहे.याबाबतची माहीती देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्या म्हणाल्या,संबधित मुलगी ही मुंबईतून आली होती.ती सतरा वर्षाची आहे.तिच्या समवेत आणखी पाच जण आले होते.त्यांची तपासणी केल्यानंतर ते निगेटिव्ह आढळून आले आहेत.सदयस्थिती त्या युवतीचा अहवाल पॉझीटिव्ह आला असला तरी तिच्यात कोणतीही लक्षणे नाहीत,तर दुसरीकडे तीची प्रकृती उत्तम आहे.तर कोल्हापुर येथे आलेल्या त्या व्यक्तींच्या कुंटूबातील संबधित गरोदर महीलेेला जिल्हा रुग्णालयात कॉरन्टाईन केले आहे.दरम्यान माता आणि बालक दोघे तंदुरूस्त आहेत.