कणकवली, ता. २९ :शहरातील जेष्ठ समाजवादी कार्यकर्ते शामसुंदर उर्फ (बाळा) शांताराम बांदेकर (८६) यांचे मंगळवारी रात्री खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.त्याच्या पश्चlत पत्नी,२मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
बाळा बांदेकर हे मूळचे मालवण तालुक्यातील कोळंब या गावातील रहिवासी होते.व्यवसाय निमित्त ते कणकवली शहरात आले.ते येथेच स्थायिक झाले.शहरात मुख्य पटवर्धन चौकात त्याचे वैशाली शॉपिग सेंटर या नावाचे दुकान आहे.पेशाने व्यवसायिक असले तरी सामाजिक चळवळीत ते अग्रही होते.शहरातील सार्वजनिक तसेच धार्मिक कार्यक्रमात हिरहीरेने पुढाकार घ्यायचे.
बांदेकर हे हट्टी स्वभावाचे असले तरी त्याचा बाणा प्रमाणिक होता. शहरात कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीच्या कार्यात स्वतःहून पुढाकार घेत.ते कार्य पार पाडत होते.त्यांच्या या निःस्वार्थी सेवाभावी कार्यामुळे त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. बाळा बांदेकर यांच्या विचारसरनीवर समाजवादी आणि दिवंगत जेष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते यांच्या विचारांचा पगडा होता.
जनतापक्षाचे ते कार्यकर्ते होते.त्याचा स्वभाव हरहुन्नरी मनमिळावू असल्याने अबाल वृद्धापर्यंत ‘बाळा’ या नावाने ते सर्वांना परिचित होते.त्यांच्या निधनाने कणकवली शहरावर शोकळा पसरली आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय,सामाजिक तसेच मित्र मंडळींनी त्याच्या निवास्थानी पार्थिवाचे दर्शन घेत कुटूंबियाचे सांत्वन केले.