Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्लेत उभ्या झेन गाडीने अचानक घेतला पेट...

वेंगुर्लेत उभ्या झेन गाडीने अचानक घेतला पेट…

ऍड.मनिष सातार्डेकर यांची गाडी; वेळीच आग विझविल्याने अनर्थ टळला…

वेंगुर्ले.ता,२९: 
वेंगुर्ले शहरातील ऍड. मनिष सातार्डेकर यांच्या झेन या गाडीच्या पुढील बाजूस आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आगिने पेट घेतला. वेळीच आजू बाजूच्या नागरिकांनी धाऊन जात आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
ऍड. सातार्डेकर हे आपल्या घरा शेजारी आपली झेन ईस्टीलो गाडी पार्क करून ठेवतात. तशी ती गाडी पार्क करून ठेवलेली होती. दरम्यान आज दुपारी साधारण १२.३० वाजण्याच्या सुमारास सातार्डेकर यांचे भाडोत्री यांनी गाडीच्या इथून जळल्याचा वास येत असल्याचे जाणवल्याने त्यानी गाडीकडे जाउन बघीतल. तर त्यावेळी गाडीच्या बाॅनेट मधुन धुर येत होता. त्यानी तात्काळ सातार्डेकर यांना फोन केला त्यामुळे सातार्डेकर तत्काळ तेथे आले असता त्यांना गाडीच्या बाॅनेटच्या इथे आग लागलेली दिसली. त्यांनी तात्काळ आपल्या जवळील पाण्याच्या पंपाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग आटोक्यात आली. तोपर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब देखील आला आणि आग पुर्ण पणे विझवली परंतु गाडीचे खुप मोठी नुकसान झाले. गाडीचा रेडीऐटर, बेटरी, लाईट, सर्व वायरीग, पुढचे टायर व शो पुर्ण जळुन गेला असून साधारण एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी व वेंगुर्ला नगरपरिषद यानी वेळीच सहकार्य केले त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला असून आपण त्यांचे आभारी असल्याचे सातार्डेकर यांनी सांगितले. शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments