सावंतवाडी ता.२९: सर्पदंश झाल्यामुळे तळवडे येथील एका ४८ वर्षीय महिलेला आपले प्राण गमवावे लागले.ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.मनीषा मोहन केळुसकर (रा.गाडगेवाडी),असे तिचे नाव आहे.दरम्यान तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची फिर्याद स्वरूपानंद मनोहर बुगडे (रा.मुरारीवाडी) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित महिला ही बुगडे यांच्या बागेत कामासाठी गेली होती.दरम्यान त्या ठिकाणी काम करत असताना तिला सर्पदोष झाला.यावेळी तिला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.दरम्यान तालुक्यात सर्पदंशाने मृत्यू होण्याची ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे.