अमृता कॅश्यु आणि झांट्ये काजू समूह यांचा उपक्रम…
कुडाळ ता.२९: अमृता कॅश्यु आणि झांट्ये काजू समूह यांच्यावतीने आज कुडाळ मधील १०० रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.सुरेश झांट्ये व सिद्धार्थ झांट्ये यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.दरम्यान याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
सुरेश झांट्ये व सिद्धार्थ झांट्ये यांच्या या सामाजिक कार्याबद्दल आ.वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले.लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद पडला आहे.या काळात रिक्षा व्यावसायिकांना मदतीचा हात देण्यासाठी आमदार वैभव नाईक हे जीवनावश्यक साहित्याचे वाटप करत आहेत. सुरेश झांट्ये व सिद्धार्थ झांट्ये यांनाही रिक्षा व्यवसायिकांना मदत करण्याचे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री. झांट्ये यांनी कुडाळ मधील रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. याबद्दल रिक्षा व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी झांट्ये काजू समूहाचे संजय नाईक, अजित पालव, प्रसन्नकुमार अंधारी,जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, बबन बोभाटे, बाळा वेंगुर्लेकर, राजू गवंडे, नितीन सावंत, संदीप राऊळ , गोट्या चव्हाण रिक्षा व्यावसायिक संजय मसुरकर, उदय वंजारे, सिद्धेश राऊळ, मंगेश परब, सचिन शेलटे आदी उपस्थित होते.