Wednesday, January 15, 2025
Google search engine
HomeUncategorizedएकीकडे 'कोरोना' तर दुसरीकडे अवकाळी पाऊस...

एकीकडे ‘कोरोना’ तर दुसरीकडे अवकाळी पाऊस…

वैभववाडी/पंकज मोरे.ता,२९:  जगभरात कोव्हिड19 कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना सारख्या घातक विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यातच कोरोना सोबत अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.
राज्यात कोरोना व्हायरचा प्रभाव वाढत असतानाच बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार बॕटींग केली. ठिकठिकाणी वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. गतवर्षी झालेल्या महापूराच्या स्थितीमधून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच बुधवारी सर्वत्र वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे…!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments