Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारेडीतील "त्या" जहाजावरून वातावरण तापले...

रेडीतील “त्या” जहाजावरून वातावरण तापले…

ग्रामस्थांचा विरोध; आरोग्याबाबत सर्व काळजी घेऊन काम सुरू,तहसिलदारांचा दावा…

वेगुर्ले ता.२९: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोका योग्य नाही,त्यामुळे रेडीतील मायनिंग नेण्यासाठी आलेले ते जहाज माघारी पाठवा,अशी मागणी आज तेथील स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली.याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.दरम्यान जहाजावर असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यातील कोणालाही कोरोनाची बाधा नसल्यामुळे आजपासून काम सुरू करण्यात आले आहे.तर या कालावधीत काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना घरी पाठवण्यात येईल.त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केले.

याबाबत श्री लोकरे म्हणाले
रेडी पोर्ट येथे इंडोनेशिया येथून मुंबई मार्गे एक जहाज मायनिंग वाहतूक करण्यासाठी दाखल झाले आहे. या जहाजाला रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोरदार विरोध केला असून परत पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. या जहाजावर कॅप्टन सह २१ परदेशी कामगार आहेत त्यांची तेथे जाऊन जिल्हा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यांना कोणताही कोरोना संदर्भात त्रास नसल्याने आज पासुन बोटीवरील काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या बोटीवर कामासाठी गेलेल्या स्थानिक १३ कामगारांची बोटीवरील काम संपल्यावर आरोग्य तपासणी केल्या नंतरच त्यांना घरी पाठवायचे की कॉरन्टाईन करायचे याचा निर्णय होईल
कामगार हे बाहेरील असल्याने या बोटीवर काम करण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक लोकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. मुंबई वरून आलेल्या कामगारांसह अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करा. जहाज भरू देणार नाही, जहाज माघारी पाठवा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी रेडी ग्रामपंचायतकडे रेडी पोर्टच्या अधिकाऱ्यांना जहाज परत पाठवण्याबाबत पत्र देण्यात यावे अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. तर याबाबत मेरिटाईम बोर्डशी सुद्धा चर्चा करण्यात आली असून गुरुवारी जिल्हाधिकारी यांची याबाबत भेट घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, आबा कोंडस्कर, बाळा दळवी, माजी पं स सदस्य चित्रा कनयाळकर, युवासेनेचे सागर नाणोस्कर, ग्रा प सदस्य नामदेव राणे, ग्रामस्थ संतोष मांजरेकर, श्रीकांत राऊळ, सुमित राणे, भूषण मांजरेकर, सौरभ नागोळकर, अभिजित राणे, सदा धुरी यांच्यासहित रेडी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments