सावंतवाडीतील वीज अधिकार्यांचे फर्मानामुळे अत्यावश्यक सेवा बोंबलली
सावंतवाडी/अमोल टेंबकर.ता,३०: कोरोनाचा रुग्ण जिल्ह्यात सापडला आहे.त्यामुळे ऑफीसमध्ये थांबू नका बाहेरुनच काम करा असे,फर्मान सावंतवाडी कार्यालयातील एका विज अधिकार्यांनी काढल्याने शहरातील विज कार्यालयातील अधिकार्यांची दारे बंद आहेत.त्यामुळे छोट्या मोठ्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना तिष्ठत रहावे लागत आहे.हा प्रकार गेले काही दिवस सुरू आहे.याबाबत अनेक वीज ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली असून,वरिष्टांनी कीमान अत्यावश्यक सेवा देताना तरी, अशा प्रकारची भूमिका घेवू नये अशी मागणी केली आहे.
दरम्यान कार्यालयात जावून माहीती घेतली असता,त्या ठीकाणी असलेल्या अनिल यादव या अधिकार्यांनी विभागीय स्तरावर काम करणार्या अभियंत्यांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे हे कारण पुढे करुन संबधित अधिकारी कार्यालयात येत नाहीत,तर ग्राहकांनी फोन केल्यानंतर येतो असे सांगुन संबधित अधिकारी येतच नाहीत,मात्र त्याचा फटका आउटसोर्सींग तसेच वायरमनांना सहन करावा लागत आहे. लोकांच्या रोषाला आम्हाला बळी पडावे लागत आहे असे सांगण्यात आले.दरम्यान याबाबत कुडाळ येथिल वरिष्ट अधिकारी श्री.एन.बी.लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता,अशा प्रकारचे कोणतेही आदेश देण्यात आलेेले नाही,मात्र त्या ठीकाणी असलेले अधिकारी काम करीत आहे. सदयस्थिती झाडे कापण्याचे काम असल्यामुळे ते फील्डवर काम करीत आहे,असे सांगुन त्यांनी आपल्या कनिष्ट अधिकार्यांच्या चुकांवर पाघरुण घालण्याचा प्रयत्न केला.
याबाबत सावंतवाडीतील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रफीक मेमन यांना सुध्दा तसाच अनुभव आला.
यावेळी त्यांनी लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता, आपण या प्रकाराची चौकशी करतो,असे त्यांनी सांगितले.मात्र मेमन यांच्या म्हणण्यानुसार गेले आठवडाभर आपण एका कामासाठी या ठीकाणी येत आहे. मात्र या ठीकाणी कोणताही अभियंता दिसत नाही, तर एक महिला अधिकारी तब्बल महिनाभर गैरहजर आहे.असे त्यांचे म्हणणे असून आपण वरिष्ट अधिकारी लोकरे यांचे या प्रकरणात लक्ष वेधले असल्याचे मेमन यांनी सांगितले.