Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकर्ज माफीचा लाभ न मिळालेल्या कोकणातील शेतकर्‍यांची कर्जे माफ करा...

कर्ज माफीचा लाभ न मिळालेल्या कोकणातील शेतकर्‍यांची कर्जे माफ करा…

नितेश राणेःसरसकट दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कणकवली.ता,३०:शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत कर्ज माफी न मिळालेल्या,कोकणातील संबधित शेतकर्‍यांना सरसकट दोन लाखापर्यत कर्ज माफी द्या,अशी मागणी भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

दरम्यान यावर्षीच्या खरीब हंगामात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खत-बियाणे व शेती पूरक आवश्यक वस्तू पुरवठा सहकारी संस्थांमार्फत मे महिन्यापर्यंत देण्यात यावा,असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.त्यात असे म्हटले आहे की,जिल्ह्यात शेतकर्‍यांना भातपिक,फळबाग शेतीपुरक खावटी व उस लागवडीसाठी जिल्ह्या बँकेकडुन कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.कोकणातील शेतकरी हा प्रामाणिक आहे.तो नेहमी वेळेत कर्जफेड करतो,त्यात सिंधूदूर्ग जिल्ह्यातील शेतकरी सर्वात पुढे आहे.या ठीकाणी कीतीही अडचणी आल्या तरी घरातील दागदागिने व कीमती वस्तू गहाण ठेवून ही कर्ज फेड केली जाते.त्यामुळे अशा प्रामाणिक शेतकर्‍यांला न्याय देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी,असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments