४५ गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक साहित्य घरपोच ; पास्कोल रॉड्रिक्स यांची माहिती…
मालवण, ता. ३० : मालवण तालुक्यातील गरजू ४५ कुटुंबांना मनविसे पदाधिकार्यांच्यावतीने जीवनावश्यक साहित्य घरपोच उपलब्ध करून देण्यात आले. मनविसे पदाधिकारी पास्कोल रॉड्रीक्स यांनी हे साहित्य संबंधितांना सुपूर्द केले.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद आहेत. हाताला काम नसल्याने जीवनावश्यक साहित्य खरेदी करणे अवघड बनले आहे. त्यामुळे अशा गरजूंना दात्यांनी आवश्यक मदत मिळवून देण्याचे आवाहन मनविसे पदाधिकारी पास्कोल रॉड्रीक्स यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला दात्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. यात तालुक्यातील सुमारे ४५ गरजू कुटुंबांना घरपोच जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.