नितेश राणेंची माहिती ; लॉकडाउनच्या संकटामुळे १ मे चा मुहूर्त पुढे ढकलला…
सावंतवाडी.ता,०२: शहरात सुरू करण्यात येणारे कंटेनर थिएटर आता १ सप्टेंबरला सुरू होणार आहे.कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनमुळे आम्हाला काही दिवस उशिर लागत आहे,मात्र आम्ही दिलेला शब्द पुर्ण करू अशी भूमिका आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मांडली आहे.येथिल पालिकेच्यावतीने जिमखाना मैदानाच्या परिसरात १ मे रोजी कंटेनर थिएटर सुरू करण्याचा शब्द श्री.राणे यांनी दिला होता.
दरम्यान काल त्यांनी आपली याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.यात ते म्हणाले आम्ही सावंतवाडीकर जनतेला १ मे ला कंटेनर थिएटर देवू असा शब्द दिला होता, मात्र कोरोनाच्या संकटामुळे थिएटर उभारणीच्या कामाला विलंब लागत आहे. तरी आम्ही दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी कटीबध्द आहोत. आता १ सप्टेंबर पर्यत आपण हक्काचे कंटेनर थिएटर सर्वासाठी खुले करू,असे त्यांनी म्हटले आहे.