जिल्हाधिकार्यांकडुन स्पष्टः १ रुग्ण असल्याने ग्रीन झोन मध्ये येण्यासाठी पाठपुरावा सुरू
सिंधुदूर्गनगरी.ता,०२: सिंधुदूर्ग जिल्हा ग्रीन झोन मध्ये येत असल्याचे केंद्र शासनाकडुन जाहीर करण्यात आले असले,तरी २९ तारखेेला नव्याने मिळालेला रुग्ण लक्षात घेता,आपला जिल्हा “ऑरेंज झोन” मध्येच राहणार असल्याचे जिल्हाधिकार्यांकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान नियमानुसार १९ दिवस पुर्ण होणे गरजेचे असल्यामुळे आम्ही पुन्हा ग्रीन झोन मध्ये येण्यासाठी प्रयत्न करू,असे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्यावतीने काल जाहीर करण्यात आलेल्या यादीत सिंधुदूर्ग जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले होतेे,मात्र नव्याने मिळालेल्या रुग्णांची नोंद लक्षात घेता त्या ठीकाणी पुन्हा एकदा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये गेला आहे.मात्र याबाबत आपण योग्य तो केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू,असे त्यांनी म्हटले आहे.