सिमा सुध्दा सिलबंद नाहीत; गावच्या सुरक्षा समितीकडुन स्पष्टीकरण…
ओटवणे ता.०२: गावात प्रसृती झालेल्या महीलेला सोडण्यासाठी आलेला भुदरगड येथिल चालक पॉझीटिव्ह मिळाल्यानंतर सोशल मिडीयावर गावाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत.याबाबत गावच्या सुरक्षा समितीकडुन गंभीर दखल घेण्यात आली असून,गावाच्या सिमा सिलबंद नाही,तसेच गावात एकही रुग्ण पॉझीटिव्ह मिळालेला नाही.तर त्या महीलेला या ठीकाणी आणल्यानंतर अर्ध्या दिवसाच्या आत शासकीय कॉरन्टाईन करण्यात आले होते.त्यामुळे कोणी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेला १५ दिवस उलटून गेले. सध्या हे पूर्ण कुटुंब घरातच विलगीकरणात असून आरोग्य कर्मचारी देखील त्यांच्यावर नजर ठेवून वेळोवेळी दखल घेत आहेत.त्यामुळे ओटवणे गांव पूर्ण सुरक्षित असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये.शासनाच्या नियमात राहून आरोग्य विषयी जागृत राहून दैनंदिनी कामकाज करावे असे आवाहनही सुरक्षा कृती समितीने केले आहे.