Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात डॉक्टरांचे काळे फीत निषेध आंदोलन सुरु...

सिंधुदुर्गात डॉक्टरांचे काळे फीत निषेध आंदोलन सुरु…

प्रशासनाने अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा ; आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठींबा…

मालवण, ता. २ : फेसबुकवर डॉ. विवेक रेडकर आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बद्दल बदनामीकारक व चिथावणीखोर पोस्ट टाकणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून सिंधुदुर्गातील डॉक्टरांनी आजपासून काळे फीत आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्गात सुरु असलेल्या या आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती रेडकर हॉस्पिटल रिअर्च सेंटर ट्रस्टचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना ठेचून मारण्याची धमकी देणाऱ्या प्रवृत्ती बद्दल वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे. अशा प्रवृत्तीचा प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त करावा व कायद्याच्या माध्यमातून शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संदेशात अधिकाधिक वैद्यकीय व्यावसायिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवेसाठी पुढे यावे असे आवाहन केले होते. वैद्यकीय व्यावसायिक त्यासाठी तयार आहेत परंतु ठेचून मारण्याची प्रवृत्ती असलेल्या काही समाजातील मानसिकतेला आळा घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. जेणेकरून एका सुरक्षित वातावरणात सेवा देणे शक्य होणार आहे.
आज सुरु असलेल्या आंदोलनामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब (DFC), असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, सर्जन असोसिएशन ऑफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू ठेवली आहे. अशा समाजातील प्रवृत्तीवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments