जिल्हाप्रशासनाचा निर्णय; रेड झोन मधून येणार्यांना थेट शासकीय कॉरन्टाईन…
सिंधुदूर्गनगरी ता.०२: लॉकडाऊन काळात केद्र शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यात बाहेरून येणार्या लोकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली तयार करण्यात आली आहे.यात ग्रीन आणि ऑरेंज झोन मधून येणार्या लोकांना २८ दिवस होम कॉरन्टाईन तर रेड झोन मधून येणार्या व्यक्तीला १४ दिवस शासकीय कॉरन्टाईन व १४ दिवस होम कॉरन्टाईनमध्ये राहणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश आज जिल्ह्याधिकार्यांकडुन पारीत करण्यात आले.दरम्यान जिल्ह्याबाहेर जाणार्या लोकांना अर्ज सादर करण्यासाठी नवी लिंक तयार करण्यात आली आहे.त्या ठीकाणी अर्ज केल्यानंतर पाच ते सहा तासात मोबाईलवर ई पास मिळणार आहे.याबाबत माहीती जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन देण्यात आली.दरम्यान या काळात ग्रामीण तसेच शहरी भागात येणार्या लोकांना कोठे कॉरन्टाईन करण्यात यावे,याचा निर्णय गाव पातळीवर समिती नेमुन सरपंच तलाठी व ग्रामसेवक आदींनी घ्यायचा आहे.तर शहरी भागात ही जबाबदारी तहसिलदार आणि मुख्याधिकार्यांकडे देण्यात आली आहे.विशेष म्हणजे रेडझोन मधुन येणार्या लोकांना चौदा दिवस शासकीय कॉरन्टाईन मध्ये राहणे बंधनकारण राहणार आहे.याकाळात कोणी फीरताना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान मजूर व कामगार वगळता इतर कोणालाही जिल्ह्यात यायचे किंवा जायचे असल्यास येणारा खर्च त्यांना स्वतःला करावा लागणार आहे.मात्र यासाठी शासनाची रीतसर परवानगी घेणे सुद्धा बंधनकारक आहे.तर दुसरीकडे मजूर व कामगारांचा खर्च शासनाकडून उचलण्यात आला आहे.असेही यावेळी सांगण्यात आले.