जिल्हा प्रशासनाकडुन विशेष लिंक जाहीर; मोबाईलवर मिळणार ई-पास…
सावंतवाडी/शुभम धुरी ता.०२: लॉकडाउनच्या काळात सिंधुदूर्ग जिल्ह्यातून बाहेर जाणार्या कामगार तसेच अन्य अडकलेल्या व्यक्तींना सहकार्य करण्यासाठी सिंधूदूर्ग जिल्हा प्रशासनाकडुन एक ऑनलाईक लिंक देण्यात आली आहे.या लिंकवर जावून अर्ज भरल्यानंतर आपल्या मोबाईलवरच ई-पास उपलब्ध होणार आहे.मात्र त्यासाठी आवश्यक असलेली माहीती त्या ठीकाणी भरणे गरजेचे आहे.याबाबतची माहीती सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
दरम्यान आज याबाबत जिल्हा प्रशासनाकडुन आदेश देण्यात आले आहेत.तर जे लोक जिल्ह्यात येणास इच्छुक आहेत,अशा लोकांनी आपण अडकलेल्या ठीकाणच्या तहसिलदार कार्यालयाकडुन कींवा सिंधुदूर्ग जिल्हा प्रशासनाकडुन खाली जाहीर करण्यात आलेला अर्ज भरणे गरजेचे आहे.त्यांना ही मोबाईलवर ई-पास देण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगितले.दरम्यान अधिक माहीतीसाठी ०२३६२२२८८४७ /
०२३६२२२८६०८ या नंबरवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.तर आज रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी https://forms.gle/xhBWCWS5JL8XaAncA
भारताच्या व महाराष्ट्राच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरावी https://forms.gle/QH64JkBy72h8tbhj7