नासिर काझी ; वैभववाडी पोलीस सहाय्यक निरीक्षकांना दिले निवेदन…
वैभववाडी.ता,०२: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी करणार्या त्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा. या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपाध्यक्ष नासीर काझी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
दिलीप बोचे फेसबुक अकाउंटवर श्री. फडणवीस यांना धमकी वजा अपमानास्पद वाक्य वारंवार लिहिली जात आहेत. ही टिप्पणी फेसबुकवरील एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक या गटावर दिसत आहे. मानहानिकारक आणि चारित्र्य बदनाम करणाऱ्या या गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीपासून श्री. फडणवीस यांच्या जीवितास धोका आहे. दिलीप बोचे रा. अकोट, शिवसेना असे नाव या आरोपीचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या व्यक्तीवर त्वरीत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी माजी सभापती अरविंद रावराणे, बाळा हरयाण, नगरसेवक संजय सावंत आदी उपस्थित होते.