सावंतवाडी,ता.०२: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सावळाराम साळगांवकर यांना मुंबई पोलीस महासंचालकांकडून उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
वेंगुर्ले साळगांवकरवाडी येथील सावळाराम साळगांवकर मुंबई दहशतवाद विरोधी पथकात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी पोलिस खात्यात केलेल्या प्रशासकीय सेवेबद्दल सन २०१९ चे पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह /सन्मानचिन्ह व प्रशतीपत्रक प्रदान करून सन्मानित केलेले आहे
श्री.साळगांवकर हे रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून महविद्यालयात असताना एन सी सी मध्ये सन १९९२ मध्ये प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे सहभाग घेतला होता. सन १९९४ पासून ते पोलिस खात्याच्या सेवेत असून त्यांनी आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात काम केले आहे. विशेष सुरक्षा विभाग मुंबई ,आयुक्तालय नागपूर ,दहशतवाद विरोध पथकामध्ये सेवा केली.सन २०१५ मध्ये त्यांना पोलिस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे
मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुंबई सध्या कार्यरत आहेत . त्यांना मीळालेल्या सन्मानाबद्दल पोलिस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे