सिंधुदुर्गनदरी ता.०२: जिल्ह्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता.या युवतीच्या संपर्कात एकूण २८ व्य्कती व्यक्ती आल्या होत्या. त्यापैकी 16 व्यक्ती कमी जोखमीच्या संपर्कातील असून त्यांना घरी अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर अति जोखमीच्या संपर्कातील 12 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या 12 सर्व व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठविलेले असून यापैकी 6 व्यक्तीचे निगेटिव्ह आले आहेत. तर 6 व्यक्तीचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. सावंतवाडी येथे गरोदर महिलेला सोडण्यासाठी आलेली व्यक्ती कोल्हापूर येथे कोरोना बाधीत असल्याचे समजले. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 8 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून या सर्वांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच सदर गरोदर स्त्री व तिचे बाळ यांची प्रकृती उत्तम आहे.
जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रूग्णावर जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये औषधोपचार सुरू करणेत आलेले आहेत. जनतेने याबाबत कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता सामाजिक अंतर ठेवून योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करणेत येत आहे.