रात्री उशिरा हजेरी; योग्य तो बंदोबस्त करा,नगरसेवक आडीवरेकर यांची मागणी…
सावंतवाडी ता.०३: येथील जुना बाजार परिसरात दहाहून अधिक गव्याच्या कळपाने आपली रात्री हजेरी लावली.ही घटना नरेंद्र डोंगर परिसरात असलेल्या करोल अवाट परिसरात घडली.भरवस्तीत आलेल्या गव्यांना अनेकांनी पाहीले.गेले अनेक दिवस गवे या परिसरात फिरत आहेत.याबाबतची माहिती उमेद अभियानचे अधिकारी अभय भिडे यांनी दिली.
त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री अडीच वाजताच्या सुमारास परशुराम अपार्टमेंट परिसरात घडली.दरम्यान भर वस्तीकडे येणाऱ्या गव्यांना रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करा,अशी मागणी स्थानिक नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी वन विभागाकडे केली आहे.त्यांना जंगल परिसरात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा,असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.गेले अनेक दिवस गव्यांचे कळप त्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत.गतवर्षी वनविभागाचे अधिकारी गजानन पानपट्टे यांच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले होते.त्यामुळे काही अंशी शहराकडे येणारे गवे रोखण्यास मदत दिली होती.मात्र उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा भरवस तिकडे गवे दिसत असल्यामुळे योग्य ती उपाययोजना करा,अन्यथा शक्यता नाकारता येत नाही,असे आडिवरेकर यांचे म्हणणे आहे.