Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामोफत तांदूळ वाटपाचे कमिशन मिळावे….

मोफत तांदूळ वाटपाचे कमिशन मिळावे….

रेशन धान्यदुकान संघटनेची मागणी  ; तहसीलदारांना निवेदन

कणकवली, ता.०३:  ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाने घोषित केलेल्या मोफत तांदूळ वाटपाचे कमिशन मिळावे. लाभार्थ्यांच्या कार्डावरील ऑनलाइन इसम संख्या ही ई – सेवा केंद्रामार्फत कमी – जास्त करावी, अशा मागण्या सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्तभाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटना यांच्यातर्फे तहसीलदार यांची भेट घेऊन करण्यात आल्या. यावेळी मागण्यांचे निवेदनही सुपूर्द करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, धान्य वाटपाबाबत शासनाकडून 27 एप्रिलच्या परिपत्रकानुसार दुकानदारांनी लाभार्थ्यांना ई – पास उपकरणावर अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याचे आदेश आहेत. पण, धान्य नेण्यास ग्राहकांची झुंबड उडत आहे. म्हणूनच शासनाने दुकानदारांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, हातमौजे आदी साहित्य उपलब्ध करून द्यावे. केंद्र शासनाने घोषित केलेले मोफत तांदळाचे मार्जिन 4 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे देय राहील, असे जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी तांदूळ वाटप केले असल्याने शासनाने घोषित केलेले कमिशन हे दुकानदारांना शालेय पोषण आहाराप्रमाणे रोख स्वरूपात मिळावे. धान्यवाटप करताना लक्षात आले की, लाभार्थ्यांच्या कार्डावरील इसमसंख्या व ऑनलाईन इसमसंख्या यात फरक दिसतो. परिणामी दुकानदार व लाभार्थी यांच्यात वादाचे प्रसंग घडतात. म्हणूनच लाभार्थ्यांच्या कार्डावरील ऑनलाईन इसमसंख्या ही ई – सेवा केंद्रामार्फत कमी – जास्त करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करतेवेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष बाबू नारकर, सल्लागार राजीव पाटकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments