नितेश राणे; धरसोड वृत्तीमुळे गावा-गावात भांडणे लागायची वेळ…
कणकवली ता.०३: मुंबई-पुणे येथे अडकलेल्या चाकरमान्यांना गावात आणण्याबाबत शासनाने एकदाचा काय तो निर्णय घ्यावा,असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.दरम्यान शासनाच्या धरसोडवृत्तीमुळे गावा-गावात भांडणे सुरू आहेत,ती थांबवण्यासाठी आता प्रयत्न करावे,असा सल्लाही त्यांनी दिला आहे.याबाबतची प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे, चाकरमान्यांना गावात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म तर कधी नावे मागितली जात आहेत. मात्र राज्य शासन त्या निर्णयावर ठाम राहत नाही.त्यामुळे या विषयावरून गावागावात सध्या भांडण-तंटे सुरू आहे.ते थांबवण्यासाठी राज्य शासनाने आता आपली धरसोडवृत्ती सोडून एकदाचा काय तो निर्णय घ्यावा,असे म्हटले आहे.