सिंधुदुर्गातील सर्व अनुदानित महाविद्यालयामधील कर्मचाऱ्यांचा पुढाकार;१० लाख सुपूर्द…
वेंगुर्ले,ता.०३: डॉ. जगताप,सहसंचालक, उच्च शिक्षण, कोकण विभाग, पनवेल यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अनुदानित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपले एक दिवसाचे वेतन एकूण रुपये १० लाख मुख्यमंत्री सहायता निधी covid १९ आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग चे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांचे कडे जमा करण्यात आले.
या निधीचा धनादेश पालकमंत्री यांच्याकडे देताना प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, डॉ गोविंद काजरेकर, श्री डी. बी. वारंग, नगरसेवक विधाता सावंत उपस्थित होते.