उदय सामंत; रेडीतील “त्या” जहाजावरील लोडींग तीन दिवस ठेवले बंद…
सावंतवाडी ता.०३: आरोग्या सारख्या प्रश्नात माणूसकी दाखवून गोव्याकडुन सिंधुदुर्ग जिल्ह्याला सहकार्य होणे अपेक्षीत आहे.त्यासाठी आपण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.दरम्यान कोरोनाच्या काळात रेडी समुद्रात दाखल झालेल्या त्या जहाजाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.त्यामुळे मी माझ्या अधिकारात सदयस्थितीत तीन दिवस लोडिंगचे काम बंद ठेवले आहे.त्यांना सशर्त काम करण्याची परवागनी दिल्यानंतर पुढील निर्णय घेवू,असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री.सामंत यांनी आज या ठीकाणी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी गोवा आणि सिंधूदूर्गचे जवळचे नाते आहे.मात्र गोवा प्रशासन या ठीकाणच्या लोकांना त्या ठीकाणी जाण्यास अटकाव करीत आहेत.याबाबत श्री.सामंत यांना विचारले असता ते म्हणाले गोवा आणी सिंधुदूर्गचे रुणानुबंध आहेत.मात्र आरोग्यासारख्या प्रश्नावर येथिल लोकांना सहकार्य होणे अपेक्षित आहे.त्यावेळी जर माणुसकी दाखविली नाही तर ते योग्य होणार नाही,तरीही त्यांच्याकडुन सहकार्य व्हावे,यासाठी गोव्यासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करू सकारात्मक चर्चा झालीच नाही,तर येथिल जनतेने घाबरण्याचे कारण नाही.तर चांगल्या रुग्णालयात आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी निश्चीतच प्रयत्न केले.मात्र गोव्याने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्यास आम्ही सुध्दा या ठीकाणावरुन वाळू खडी भाजीपाला पाठवतो,हे त्यांनी विसरू नये, असा टोला लगावला.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,अतुल रावराणे,संजय पडते, रुपेश राऊळ,सागर नाणोसकर,गुणाजी गावडे,शब्बीर मणियार,अनारोजीन लोबो, भारती मोरे आदी उपस्थित होते.