प्राणीमित्रांसह वनकर्मचार्यांची धडपड; मोती तलावाच्या मध्यभागी अडकलेला तो अनाहुत पाहुणा…
सावंतवाडी/निखिल माळकर,ता.०३: येथिल मोती तलावात अडकलेल्या पाणबुडी पक्ष्याला आज सावंतवाडी शहरातील काही प्राणी मित्रांसह वनविभागाच्या कर्मचार्यांनी वाचविण्यास यश मिळविले.
तोंडात कपडा अडकल्याने गेले दोन दिवस हा पक्षी एकाच ठीकाणी होता.त्यांच्या तोंडात मोठा कपडा अडकल्यामुळे त्याला उडता येत नव्हते. त्यामुळे तो एकाच ठीकाणी बसून होता.मात्र हा प्रकार श्री.धारपवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून त्या पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न केला.त्यानंतर होडीच्या सहाय्याने तलावात जात त्यांनी त्या पक्ष्याला मुक्त केले.यावेळी वनविभाग कर्मचार्यांसह तेथे जमलेल्या काही प्राणीमित्रांनी त्यासाठी सहकार्य केले.
यावेळी राजू धारपवार,सुरेश नायर,लवू नाईक,रोहन मांजरेकर,आज्या मांजरेकर,अभि परब,मोहन कर्पे,सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे,माजगाव वनरक्षक ज्ञानेश्वर जाधव,महादेव गेजगे,विश्वनाथ माळी आदी उपस्थित होते.