निलेश राणें; व्टीटरच्या माध्यमातून शासनावर निशाणा..
कणकवली,ता.०३: चाकरमान्यांना गावी आणण्याबाबत वेगवेगळ्या भूमिका घेवून सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करीत आहे. हे योग्य नाही, अशी नाराजी माजी खासदार तथा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत त्यांनी व्टिटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, चाकरमान्यांना गावी आणण्याबाबत सरकार वेगवेगळया भूमिका घेत आहे. आधी ग्रामपंचायतकडुन नावे घेतली, आणि तो निर्णय रद्द केला. त्यांनतर ऑनलाईन फॉर्म काढले, दोन तासात तो ही निर्णय रद्द केला. एकुणच हे सर्व नियम निर्णय पाहता सरकार चाकरमान्यांच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.