सिंधुदुर्गनगरी ता.०३: आजमितीस जिल्ह्यात एकूण ४६२ व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी ३२० व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर १४२ व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण 478 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 440 नमुन्यांचा तपासणी आहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 438 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर अजून 38 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 73 व्यक्ती दाखल असून त्यातील 57 व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये तर 16 व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आज रोजी आरोग्य विभागामार्फत एकूण 2632 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
अ.क्र विषय संख्या
1 घरीच अलगीकरण करण्यात आलेले 320
2 संस्थात्मक अलगीकरणात असलेले 142
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 478
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 440
5 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 2
6 निगेटीव्ह आलेले नमुने 438
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 38
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 73
9 सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 1
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2632
त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह
जिल्ह्यात दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी आणखी एक कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. या रुग्णाच्या संपर्कात एकूण 28 लोक आले होते. तर सावंतवाडी येथे गरोदर महिलेस सोडण्यासाठी आलेली व्यक्ती कोल्हापूर येथे कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील 4 लोक या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. असे एकूण 32 लोक कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील 17 व्यक्ती या थेट नजीकच्या संपर्कातील आहेत. तर 15 व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. या सर्व 17 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे आहवाल निगेटिव्ह आले आहेत.