प्रत्येकी पंधरा हजारांची मदत; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वितरण…
सावंतवाडी,ता.०३: लॉकडाऊन च्या कालावधीत अडचणीत सापडलेल्या दशावतारी कलाकारांना जिल्हा शिवसेनेच्यावतीने मदतीचा हात देण्यात आला असून, जिल्ह्यातील चाळीस दशावतार कंपनीना प्रत्येकी पंधरा हजार प्रमाणे एकूण पाच लाख रुपयाची मदत आज उदय सामंत यांच्या उपस्थितीत देण्यात आली.
कोरोना मुळे गेला महिनाभर लॉकडाऊन सुरू आहे. यात अनेक जण अडचणीत सापडले असून, उपासमारीची वेळ अनेकांवर येऊन ठेपली आहे. पारंपारिक दशावतारी कला जोपासणाऱ्या दशावतारी कलाकारावरही आर्थिक संकट निर्माण झाले होते. जिल्ह्यातील या कलाकारांनी आपली व्यथा शिवसेनेचे पर्यंत पोहोचवली होती. याची दखल घेत शिवसेनेच्यावतीने पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपयाची ची मदत आज दशावतार कंपनीच्या मालकाकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केली. सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेजच्या सभागृहात शासनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला पहिल्या टप्प्यात ४० दशावतार कंपनीच्या मालकांना उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, विक्रांत सावंत, रूपेश राऊळ, सागर नाणोसकर, योगेश नाईक, गुणाजी गावडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
कोणासोबत राहायचे हे तुम्ही ठरवा. यावेळी उपस्थितांना संबोधताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, पडत्या काळात सर्वांसोबत शिवसेना उभी राहत आली आहे. आणि राहणार नाही आहे. आज आश्वासने देणारे अनेक आहेत. मात्र ती पूर्ण करण्याची धमक शिवसेने मध्येच आहे त्यामुळे दशावतार कलाकाराने भविष्यात कोणाला साथ द्यावी, व कोणासोबत राहावे, हे ठरवावे.