वेंगुर्ला, ता.०३:अगदी अल्प सेवेच्या कालावधीत उल्लेखनीय व प्रशंसनीय स्वरुपाचे काम केल्याबद्दल वेंगुर्ला पोलिस स्थानकातील पोलिस नाईक प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
सिधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांनी काळसेकर यांची शिफारस महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली होती. प्रमोद काळसेकर यांना २०१८ मध्ये मर्डर केसमध्ये उत्कृष्ट तपास पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी २०१७ ते २०१९ या कालावधीत सावंतवाडी मोती तलावामध्ये बुडताना ३ लोकांचे प्राण वाचविले होते. तसेच जून २०१९ मध्ये झाराप – नेमळे येथे हायवेवर रात्रीच्यावेळी पावसात अपघातात जखमी झालेल्या २ व्यक्तींचे प्राण वाचविण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याने वेंगुर्ला तालुक्यात त्यांचे अभिनंदन होत आहे.
पोलिस नाईक प्रमोद काळसेकरांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES