Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"त्या" युवकावर प्रशासनाची बदनामी केल्याचा गुन्हा...

“त्या” युवकावर प्रशासनाची बदनामी केल्याचा गुन्हा…

सावंतवाडी तहसीलदारांच्या सूचना; क्वारंटाईनचे नियम तोडल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.०३: येथील शासकीय विलगीकरण कक्षात चांगलं जेवण मिळत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल करून प्रशासनाची बदनामी केल्याप्रकरणी “त्या” युवकावर तथा रुग्णवाहिका चालक हेमंत वागळे याच्यावर गुन्हा दाखल करा,अशा सूचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सावंतवाडी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली.
श्री.म्हात्रे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे,संबंधित युवकाने मुंबई येथून प्रवास करून आल्यानंतर त्याला याठिकाणी शासकीय क्वारंटाईन करण्यात आले होते.दरम्यान या काळात त्याने प्रशासकीय यंत्रणेकडून क्वारंटाईनमध्ये असलेल्यांना चांगले जेवण मिळत नसल्याची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तर हा व्हिडीओ बनविताना क्वारंटाईन सेंटरवर नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची परवानगी न घेता त्याने इतर खोल्यांमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी क्वारंटाईन असलेल्यांच्या जेवणाच्या पाकिटांना हात लाऊन हा व्हिडिओ बनविला होता.त्यामुळे सोशल डिस्टन्ससिंगचे उल्लंघन केल्याचा आरोप करत प्रशासनाची बदनामी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments