Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याऑलिव्ह रिडले कासवाच्या ६५ पिल्लांना सुरक्षितरित्या जीवदान...

ऑलिव्ह रिडले कासवाच्या ६५ पिल्लांना सुरक्षितरित्या जीवदान…

शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावरील घटना

वेंगुर्ला.ता,०३: शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव जातीच्या सुमारे ६५ पिल्लांना काल समुद्री अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले.
शिरोडा-किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालून जातात. ही अंडी निदर्शनास आल्यावर शिरोडा ग्रामपंचायत सदस्य गुणाजी उर्फ आजु अमरे, कासवमित्र आबा चिपकर हे ती सवरक्षित करून ठेवतात. या किनाऱ्यावर यांनी संरक्षित केलेल्या अंड्यांपैकी आज ६५ पिल्ले खड्यातून बाहेर आली. तत्काळ या कासव मित्रांनी वनविभागाला या बाबत माहिती दिली. आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व कांदळवन प्रकल्प समन्वयक अमित रोकडे यांच्या उपस्थितीत आजु अमरे व कासव मित्र आबा चिपकर यांनी सुरक्षित केलेली ६५ पीले समुद्राच्या पाण्यात सोडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments