माजगावच्या शिक्षकाचा वेगळा पायंडा; स्वतःअपंग असून सुध्दा देणार सेवा…
सावंतवाडी/भक्ती पावसकर,ता.०४: लॉकडाउनच्या काळात दहावीत शिकणार्या मुलांचे नुकसान होवू नये, यासाठी येथिल गुरूकृपा क्लासेसच शिक्षक संजय सावंत यांनी थेट मुलांच्या घरी जावून इंग्लिश,विज्ञान आणि गणित या तीन विषयाची शिकवणी तयारी दर्शविली आहे. गेली वीसहून अधिक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेले श्री.सावंत हे अपंग आहेत, तरीही एक समाजसेवा म्हणून येत्या दहा तारखेपासुन ते ही जबाबदारी स्विकारणार आहेत.
माजगाव येथिल श्री.सावंत यांनी लॉकडाउनच्या काळात किमान चार महीने तरी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सावंतवाडी परिसरातील मुलांच्या पालकांनी त्यांना जबाबदारी दिल्यानंतर अत्यंत माफक कींमतीत ते ज्ञानदान देणार आहेत. तसेच एखाद्या ठीकाणी मुलांची संख्या जास्त असल्यास सोशल डिस्टंसिंग ठेवून त्यांची शिकवणी घेतली जाणार आहे. त्यात मराठीसह सेमी इंग्लिश व इंग्लिश मिडीयमच्या मुलांना शिकवण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. याबाबत इच्छुकांनी ९११२९८२०७८ या नंबरवर संपर्क साधावा.