सावंतवाडीतील घटना; गैरसमजातून प्रकार झाल्याचे तहसिलदारांचे म्हणणे…
सावंतवाडी ता.०४: स्वॅब घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलेला एक कॉरन्टाईन व्यक्ती थेट घरी गेल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली.मात्र त्यााने आपल्याला माहीत नसल्याचे सांगितल्याने माफीनाम्यावर त्याला पुन्हा कॉरन्टाईन करण्यात आले आहे.याबाबत सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी दुजोरा दिला आहे.संबधित युवकाला आरोग्य विभागाने पोलिसांकडे सुपूर्द करणे गरजेचे होते,मात्र त्याला सोडल्याने आपला अहवाल निगेटिव्ह आला,असे त्याला वाटले आणि तो घरी गेला,मात्र त्याला पुन्हा आणण्यात आले आहे,असे त्यांनी सांगितले.
याबाबत श्री म्हात्रे म्हणाले,
संबधित युवक हा मुंबईतून आल्याने त्याला कॉरन्टाईन करण्यात आले होते.आज त्याला जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी नेण्यात आले.त्या ठीकाणी चाचणी केेल्यानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्या युवकाला आपण आता घरी जाण्यास हरकत नाही, असे वाटले आणी तो थेट घरी रवाना झाला,मात्र अचानक गायब झाल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. त्यानंंतर त्याला तात्काळ मोबाईलवर संपर्क करण्यात आला.यावेळी आपण घरी जात असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र आपण कॉरन्टाईनचे नियम सांगितल्यानंतर त्याने पुन्हा कॉरन्टाईन होण्याचे मान्य केले. असे म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान हा प्रकार गैरसमजूतीमुळे घडला संबधित युवकाची तपासणी केल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी त्याला पोलिसांकडे देणे गरजेचे होते. मात्र त्याला तेथेच सोडल्यामुळे हा प्रकार घडला.