राजू मसुरकर यांची माहीती; पाठपुरावा करा,गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे मागणी…
सावंतवाडी ता.०४: गोवा-बांबुळी रुग्णालयात सर्वसामान्य रूग्णांना मिळणारा आरोग्य विमा योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे.त्यामुळे त्याठिकाणी जाणाऱ्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता आहे.केवळ गोवा शासनाकडून आवश्यक असलेल्या कराराची पूर्तता न झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.मात्र या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि अन्य लोकप्रतिनिधी अधिकारी पाठपुरावा करावा,अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी केली आहे.
याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.यात एप्रिल पासून हा करार संपल्याने अनेक अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.