कृषी अधिकार्यांची माहिती; गर्दी टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी खरेदी करा…
ओरोस,ता.४: खरीप हंगामासाठीची जिल्हय़ात काहि प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध झाली आहेत. पाऊस पडल्यावर एकदम खरेदीसाठी न शेतकऱ्यांनी ती आताच घेऊन ठेवावीत. तसेच शासकीय व खाजगी रोपवाटीकांमधून तब्बल ३३ लाख काजू रोपे तयार आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी.जी. बागल यानी सोमवारी कृषि समिती सभेत केले.
जिल्हा परीषद कृषी समितीची ८ एप्रिलची तहकुब करण्यात आलेली सभा सोमवारी सभापती तथा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक ठाकुर, सदस्य रणजित देसाई, सुधीर नकाशे, अमरसेन सावंत, महेंद्र चव्हाण, अनुप्रिती खोचरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. सी. जी. बागल, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
दरम्यान खते, बियाणे, अवजारे, इत्यादीची विक्री, दुरूस्ती व शेती कामासाठी जाणारी माणसे याना केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडण्यास मुभा दिलेली आहे. पोलिसांकडुन मात्र त्यांना काहि वेळा अटकाव केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक याचे लक्ष वेधण्यात येणार असुन शेतकऱ्यांना त्रास होणार नाहि याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेहि बागल यानी स्पष्ट केले.