Tuesday, January 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedविधान परिषदेची १ जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी... 

विधान परिषदेची १ जागा रिपब्लिकन पक्षाला द्यावी… 

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची भाजपकडे मागणी…

*मुंबई ता.०४:* महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणुक होत आहे.त्यातील ४ जागा  भाजपच्या वाट्याला येणार आहेत. भाजप ला जिंकता येणाऱ्या ४ जागांपैकी १ जागा भाजप ने रिपब्लिकन पक्षाला द्यावी,अशी मागणी  आज रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
या मागणीचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  भाजप चे महाराष्ट्र्र अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविले आहे. त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेची  एक जागा  देऊन  सामाजिक समतोल  साधावा. रिपाइंला विधान परिषदेची एक जागा दिल्यास त्यातुन
राज्यातील आंबेडकरी जनतेला ताकद देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यातून चांगला सामाजिक संदेश जाईल. त्याची  पुढील काळात भाजपला ही चांगली मदत होईल असे सांगत ना रामदास आठवले यांनी भाजप चे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आरपीआय ला एक विधान परिषदेची जागा देण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments