पालिका प्रशासनाकडुन हीरवा कंदील; व्यापारी संघटनेेच्या अध्यक्षांची माहिती…
सावंतवाडी,ता.०४: शहरातील मोठी कॉप्म्लेक्स मधील दुकाने वगळता, अन्य आस्थापने सुरू करण्यासाठी सावंतवाडी मुख्याधिकार्यांनी परवागनी दिली आहे. अशी माहीती सावंतवाडी व्यापारी संघटनेेचे अध्यक्ष जगदिश मांजरेकर यांनी दिली.
शासनाच्या नियमानुसार बंद राहणार्या कॉम्प्लेक्स मध्ये रामेश्वर प्लाझा, वसंत प्लाझा, इंदीरा गांधी व्यापारी संकुल, पाटेश्वर कॉम्प्लेक्स, पाटील कॉम्प्लेक्स ,बाप्पा नार्वेकर कॉम्प्लेक्स आदीचा समावेश आहे. तर उघडण्यात येणार्या आस्थापनात सुवर्णकार, हार्डवेअर, इलेक्ट्रीक, इलेक्टॉनिक्स, सलून जनरल स्टोअर्स,पानपटटी, कापड दुकान आदी इतर सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर हॉटेल, कोल्डीक्स यांना पार्सल व घरपोच सेवा देता येणार आहे. त्यांना दुकानात ग्राहक बसवता येणार नाहीत. तसे आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. असा इशारा प्रशासनाकडुन देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालक करुन आपला व्यावसाय करा. तसेच ग्राहक सुरक्षित राहणार आहे. याची काळजी घ्या, असे श्री मांजरेकर यांनी म्हटले आहे.