पणजी,ता.०४: चिंचोली कुंकळी (मडगाव) येथे नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवक बुडाला आहे. तो मूळचा वेंगुर्ला तालुक्यातील आहे. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. त्याला वाचवण्यासाठी गेलेला मित्र सुदैवाने बचावला आहे. परंतु अद्याप पर्यंत त्या युवकाचा मृतदेह आढळून आलेला नाही.
याबाबत कुंकळी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे तेथून मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित युवक हा आपल्या मित्रांसमवेत मासे पकडण्यासाठी गेला होता. भरती-ओहोटीचा अंदाज न आल्यामुळे तो नदीत वाहून गेला. हा प्रकार त्याच्या समवेत असलेल्या मित्राने पाहिला त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत तो वाहून गेला. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांना बोलावण्यात आले, परंतु उशिरापर्यंत शोध घेऊन सुद्धा त्याचा मृतदेह सापडलेला नाही याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
वेंगुर्ल्याचा युवक मडगाव-कुंकळी मध्ये नदीत बुडाला…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES